*जिल्हा परिषद ढाकेफळ शाळेच्या विद्यार्थ्यांचे योगासन स्पर्धेत राज्यस्तरावर घवघवीत यश*
केज: प्रतिनिधी .
राज्यस्तरीय योगासन स्पर्धा दिनांक 2 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे उत्साहात पार पडल्या. या योगासन स्पर्धेसाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकेफळ येथील विद्यार्थिनीं कु.कार्तिकी ज्ञानेश्वर थोरात व कु.प्रियंका गोविंद थोरात यांनी आर्टिस्टिक पीअर योगा या प्रकारामध्ये राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश मिळवले.
राज्यस्तरावर खेळण्यापूर्वी सदरील विद्यार्थिनींचा तालुका जिल्हा व विभाग स्तरावर प्रथम क्रमांक आलेला होता त्यामुळेच त्या राज्यस्तरावर खेळण्यासाठी पात्र ठरल्या.
राज्यस्तरावर आठ विभागातून आलेल्या विविध स्पर्धकांनी सर्वोत्कृष्ट अशी योगासने सादर केली. सादर केलेल्या योगासनामध्ये ढाकेफळ शाळेच्या विद्यार्थिनींनी सर्व तृतीय क्रमांक मिळवला. छत्रपती संभाजी नगर विभागातून योगासनामध्ये बक्षीस मिळवणारी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकेफळ ही एकमेव शाळा आहे.
मागासलेल्या व ग्रामीण भागातून सदरील विद्यार्थिनी राज्यस्तरावर खेळावयास गेल्या व यश मिळवले त्याबद्दल कार्तिकी ज्ञानेश्वर थोरात व प्रियंका गोविंद थोरात तसेच त्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका श्रीम. मेघना नेहरकर मॅडम शाळेचे मुख्याध्यापक श्री.धनराज अंधारे सर व सर्व स्टाफ यांचे सर्व स्तराकडून कौतुक होत आहे.
शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर थोरात उपाध्यक्ष श्रीम. आशाबी उस्मान सय्यद यांनी कौतुक केले.
केज केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.संजय चवरे सर, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री. दत्तात्रय चाटे साहेब तसेच केज तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.सुनील केंद्रे साहेब यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद च्या शाळा या दर्जेदार असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकडे त्यांचा कल असतो हे ढाकेफळ गावच्या शाळेने सिद्ध करून दाखवले.








Leave a Reply