खंडोबा यात्रेनिमित्त ” स्वानंद सार्वजनिक वाचनालयात ” ग्रंथप्रदर्शन,ग्रंथवाचन, व्याख्यान, कथाकथन कार्यक्रम संपन्न

खंडोबा यात्रेनिमित्त ” स्वानंद सार्वजनिक वाचनालयात ” ग्रंथप्रदर्शन,ग्रंथवाचन, व्याख्यान, कथाकथन कार्यक्रम संपन्न.

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजानिक वाचनालय, आनंदगांव ता. केज जि. बीड येथे दिनांक २५ ते २९ नोव्हेंबर २० २५ या कालावधीत ५ दिवस सलग ग्रंथप्रदर्शन, ग्रंथवाचन, व्याख्यान, कथाकथन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

२५ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

२५ नोव्हेंबर २० २५ रोजी ग्रंथप्रदर्शन व ग्रंथवाचन कार्यक्रम घेण्यात आले.

ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याच दिवशी ” ग्रंथवाचन ” कार्यक्रमही घेण्यात आला. कु. अक्षदा सौदागर, जयंत सौदागर, रामराजे गायकवाड, आनंद( भैय्या) गायकवाड यांनी ग्रंथवाचन केले. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड हे होते.

२६ नोव्हेंबर २०२५ रोजी ” ग्रंथ प्रदर्शन व ग्रंथवाचन ” कार्यक्रम घेण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

ग्रंथप्राशनाला माजी पंचायत समिती सदस्य अर्जुन वैरागे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक छाननाना गायकवाड, डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड यांनी ग्रंथवाचन केले. यात्रेचा मुख्य दिवस असल्याने ग्रंथप्रदर्शनाला केज तालुका व बाहेरून आलेल्या लोकांसह गांवकर्यांनीही उत्स्फुर्त सहभाग घेतला.

दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रंथप्रदर्शनात कथाकथन कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.

माजी सरपंच रामराजे गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेशराव गायकवाड, बबन पुंड, आरुण गायकवाड, नारायण गायकवाड, रावसाहेब जाधव, रावसाहेब गायकवाड, महादेव गायकवाड यांनी सदभाग घेवून कथाकथन कार्यक्रमात रंगत आणली. तसेच ग्रंथर प्रदशनानातही जेष्ठ नागरिकांनी सक्रीय सहभाग घेतला.

 

दिनांक २८ नोव्हेंबर २० २ ५ रोजी ग्रंथप्रदर्शन व ग्रंथवाचन, कथाकथन कार्यक्रमात विद्यार्थी – विद्यार्थिनी सक्रीय सहभाग घेतला विविध बालकथा सांगूण ग्रंथप्रदशनालाही उत्तम प्रतिसाद दिला.

दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी

ग्रंथप्रदर्शन व व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आले.

ग्रंथप्रदर्शनाला व व्याख्यान कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून बीड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर. डी. कदम, सह उपायुक्त डॉ. डी. टी. मसने, सहआयुक्त डॉ. सुदर्शन मुंडे

या ३ मान्यवरांची थोडक्यात व्याख्याने झाली. तिनही वक्त्यांनी ग्रंथालयाचे व ग्रंथालयी न कार्याचे कौतुक केले. ग्रामीण महाराष्ट्रातील सर्वोत्तम व लोपा भिमुख म्हणून ” स्वानंद सार्वजनिक वाचनालय ” आनंदगांव ता. केज जि. बीड हे ग्रंथालय असल्याचे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. आर. डी. कदम, सह उपयुक्त डॉ. डी. टी. मसने, सहउपायुक्त डॉ. सुदर्शन मुंडे यांनी प्रतिपादन केले.

अध्यक्षस्थानी सरपंचपती गोविंद गायकवाड हे होते. प्रमुख उपस्थितीत माजी उपसरपंच आशोक भोगजकर, माजी सरपंच रामराजे गायकवाड, शिवाजीराव पौळ, शिवदास गायकवाड, श्रीकुमार गायकवाड, दिलीप गायकवाड, भास्कर गायकवाड, नारायण गायकवाड यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रंथालयाचे आनंद ( भैय्या ) गायकवाड यांनी केले.सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वसुदेव( बप्पा ) गायकवाड यांनी केले तसेच सर्व मान्यवरांचे पुष्पहार देवून स्वागतही डॉ. वसुदेव( बप्पा) गायकवाड यानी केले. ग्रंथ प्रदर्शनातही मान्यवरांनी व वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!