कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीला समाज बांधवांनी उपस्थित रहावे — बापूसाहेब सोळुंके

कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीला समाज बांधवांनी उपस्थित रहावे — बापूसाहेब सोळुंके

 

बीड शहर प्रतिनिधी – मराठा क्रांतीसुर्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांची 25 सप्टेंबर रोजी 92 वी जयंती आहे तरी सदरील कार्यक्रमाला बीड तालुक्यासह जिल्हाभरातून मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे यांनी केले आहे.

कै. आमदारांना साहेब पाटील यांची 92 वी जयंती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठवाडा विभागीय कार्यालय बीड येथे होणार असून या कार्यक्रमाला समाज बांधवांनी तसेच सर्व मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व समन्वयकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. सदरील कार्यक्रम हा सकाळी ठीक साडेअकरा वाजता होणार असून या कार्यक्रमाला सर्व मराठा समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब सोळुंके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!