शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन मराठवाड्याला समन्यायी पाण्याचे वाटप झाले पाहिजे – भाई जयंत पाटील

शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन मराठवाड्याला समन्यायी पाण्याचे वाटप झाले पाहिजे – भाई जयंत पाटील

 

मराठवाड्यात नवीन युवकांना काम करण्याची संधी मिळणार.

 

 

केज ( प्रतिनिधी ) मराठवाडा सातत्याने दुष्काळी झळा सहन करत असतो, तर पश्चिम महाराष्ट्र सह इतर काही भागात महापुरामुळे गावेची गावे पाण्याखाली येतात. वास्तविक मराठवाड्याचे हक्काची समन्यायी पाण्याची मागणी अनेक दिवसांपासून असताना देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे काही लोक केवळ मराठवाड्याला समन्यायी पाणी करण्याच्या केवळ वल्गाणा करून मराठवाड्यातील जनतेला वेड्यात काढण्याचे काम करत आहेत ही बाब शेतकरी कामगार पक्ष कदापी खपवून घेणार नाही तर मराठवाड्याला समन्यायी पाणी वाटप झाल्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी घोषणा शेतकरी कामगार पक्षाचे नेते सरचिटणीस भाई जयंत पाटील साहेब यांनी केली. पक्ष बांधणी संदर्भात नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे वक्तव्य जयंत पाटील यांनी बोलुन दाखवले.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा एस व्ही जाधव होते कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पक्षाचे सहचिटणीस भाई बाबासाहेब देवकर, महिला आघाडीच्या ॲड मानसी म्हात्रे ,भाई बाबुरावजी लागारे ,चित्रलेखा गोळेगावकर नारायण गोले पाटील, भाई उदय गवारे, विष्णुपंत घोलप, ॲड गोविंद डुमणे, बाळासाहेब धस यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी, तुषार गोळेगावर ,किरण खपले, अमोल दिक्षीत, उत्तम अमृतराव, सुशिल सोमवंशी, राजाराम रसाळ, आसद बल्खी, शिवाजी सुरवसे, राजु सुरनर, यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेळावा समन्वयक भाई मोहन गुंड यांनी केले, सुत्रसंचलन हनुमंत घाडगे सर यांनी केले

तर आभार प्रा उमाकांत राठोड यांनी केले. अशोक रोडे ॲड निखिल बचुटे मुंजा पांचाळ मंगेश देशमुख यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले..

 

चौकट

केजध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या विभागीय मेळाव्याच नियोजन कमी वेळात मोहन गुंड टिमणे केलं याचं कौतुक पक्षाच्या वरिष्ठांनी केले, सर्वांशी संपर्क असणाऱ्या मोहन गुंड यांना पक्षाने जबाबदारी द्यावी आस कार्यकर्ते बोलून दाखवत होते, त्यामुळे लवकरच मोहन गुंडवर जिम्मेदारी पडेल कालच्या मेळाव्यातुन दिसून आले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!