जीवन विकास शिक्षण मंडळ संचलित, *स्वामी विवेकानंद शाळेच्या १०० टक्के निकालासह उज्वल यशाची परंपरा कायम

जीवन विकास शिक्षण मंडळ संचलित,

*स्वामी विवेकानंद शाळेच्या १०० टक्के निकालासह उज्वल यशाची परंपरा कायम*

*—————————————–*

समीक्षा चाटे, जोयाफातेमा सय्यद, सुरज मुंडे १०० पैकी १०० टक्के गुण मिळवुण स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेतुन सर्वप्रथम

*—————————————–*

९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणारे एकूण १२८ विद्यार्थी

*=============================*

 

*केज प्रतिनिधी: दि. १३ मे-* जीवन विकास शिक्षण मंडळ संचलित, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर [ माध्यमिक विभाग ] केज या शाळेतील विद्यार्थ्यांनी मार्च- २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी. बोर्ड परिक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले. या शाळेचे विद्यार्थी कु. चाटे समीक्षा सचिन, सय्यद जोयाफातेमा जुबेर चि. मुंडे सुरज भाऊराव या विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० टक्के गुण संपादीत करून शाळेतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला. कु. डोईफोडे शालिनी प्रकाश, तांबारे वैष्णवी चंद्रशेखर, कदम शंभूराजे भागवतराव ९९.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर कु. शिंदे शाश्वती पुरुषोत्तम ९९.४० टक्के गुण मिळवून शाळेतुन तृतीय आली. या परीक्षेस एकूण २३३ विद्यार्थी बसले होते. तेंव्हा शाळेचा एकूण निकाल १०० टक्के लागला असुन विशेष प्राविण्यासह २२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणारे एकूण १२८ विद्यार्थी आहेत.

 

*शाळेतील ९८ टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी-*

हरणमारे शाहिद सय्यद – ९९.२०

भुसारे समीक्षा प्रचंड – ९८.८०

चाटे प्रथमेश महादेव – ९८.८०

केदार ओमकार दत्तात्रय – ९८.८०

कांबळे पूर्वी व्यंकट – ९८.६०

गायके आकांक्षा रत्नाकर – ९८.४०

सत्वधर हर्षा दत्ता – ९८.४०

काटकर मानसी रामभाऊ – ९८.२०

नेहरकर भक्ती विनायक – ९८.२०

मुंडे श्रावणी अनिल – ९८.२०

हिरवे प्रज्वल बाबासाहेब – ९८.००

काळे वेदिका वैजनाथ – ९८.००

 

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, उपाध्यक्ष नईमोद्दीन इनामदार, सचिव जी. बी. गदळे, सहसचिव उपेंद्र कोकीळ, कोषाध्यक्ष फजिलोद्दिन काजी, विलास जोशी, नारायण अण्णा अंधारे, संदीप इंगळे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, स्वयंअर्थ सहाय्यित शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत घाडगे मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे, प्रा. वि चे मु.अ. वसंत शितोळे, प्राचार्य शंकर भैरट तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छाही दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!