खुन केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता..!
केज/प्रतिनिधी
केज येथील मा.प्रथम अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री.के. डी. जाधव साहेब यांनी सत्र प्र.नं.१६४/२०२३ मधील आरोपी नामे राजू उर्फ टुल्या शिंदे याची भा.दं.वि.चे कलम ३०२,३२३ च्या आरोपातून दिनांक २४ मार्च २०२५ रोजी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ॲड.डी. एम.काजगुंडे यांनी काम पाहिले.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी सायं.६ ते ७ वा. सुमारास सखुबाई शिंदे यांना दारू पिण्यासाठी व गांजासाठी पैसे दे म्हणून आरोपी नामे राजू उर्फटुल्या याने गळ्यामध्ये रस्सी बांधून आवळून ओढत तिच्या घरासमोरील म्हैस बांधण्याच्या झाडा शेजारी खाली पाडून दगडाने कपाळावर नाकावर हनुवटीवर मारून जखमी करून ठार मारले अशी फिर्याद फिर्यादीने पोलीस स्टेशन केज येथे गु.र.नं.१६/२०२२ प्रमाणे फिर्याद दाखल केली. त्यावरून आरोपीविरुद्ध भा.दं.वि.चे कलम ३०२,३२३ प्रमाणे गुन्ह्याची नोंद होऊन प्रकरणाचा तपास एपीआए एस. जी.मिसळे यांनी केला व आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालययात पाठवले. प्रस्तुत प्रकरणांमध्ये सरकारी पक्षाच्या वतीने एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले आरोपीच्या वतीने ॲड.डी.एम. काजगुंडे यांनी साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास व केलेला अंतिम युक्तिवाद ग्राह्य धरून मा.न्यायालयाने सदर प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ॲड.डी.एम. काजगुंडे यांनी काम पाहिले. व त्यांना ॲड.एस.एम. हारेपाटील ,ॲड. बी.आय. चौधरी,ॲड.ए. डी.राठोड,ॲड. अक्षय इंगळे,ॲड.अतुल शेरेकर, ॲड.रमेश शेंडगे यांनी सहकार्य केले.








Leave a Reply