लोकशाहीत पत्रकारांचे स्थान महत्वाचे -प्रा.ईश्वर मुंडे पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न. 

लोकशाहीत पत्रकारांचे स्थान महत्वाचे -प्रा.ईश्वर मुंडे पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न.

 

केज/प्रतिनिधी

 

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसिध्दी माध्यमे आपले काम करत असतात.लोकशाही बळकटीकरणात पत्रकारांचे योगदान महत्वाचे असून शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांच्या प्रसार प्रचारा सोबतच शासनाच्या चुकीच्या धोरणाचे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून माध्यमांचे प्रतिनिधी काम करत असतात.त्यांचाही समाजात यथोचितसन्मान होणे आवश्यक असते असे मत प्रा.ईश्वर मुंडे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या केजतालुका नुतन पदाधिकारी यांच्या नुकत्याच निवडी झाल्या.

यामुळे केज येथे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील,कार्याध्यक्ष नंदूलाल मिसाळ,सचिव विजय बिक्कड,उपाध्यक्ष प्रदिप गायकवाड यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार राष्ट्रवादी कॅांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सेवा निवृत्त अधिकारी सेलचे राज्य प्रमुख तथा ईश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव प्रा.ईश्वर मुंडे यांनी ह्रदय सत्कार केला.यावेळी ते बोलत होते.यासत्काराबद्दल केज तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील व कार्याध्यक्ष नंदूलाल मिसाळ यांनी प्रा.ईश्वर मुंडे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!