लोकनेते कै. बाबुरावजी आडसकर यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आडस येथे भावपूर्ण अभिवादन

लोकनेते कै. बाबुरावजी आडसकर यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आडस येथे भावपूर्ण अभिवादन;

 

अक्रुर महाराज साखरे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने परिसर भक्तीमय;

 

विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती

 

आडस, दि. १२ : प्रतिनिधी

लोकनेते तथा माजी आमदार कै. बाबुरावजी आडसकर (तात्या) यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी आडस येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी कै. बाबुरावजी आडसकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी व आडसकर कुटुंबावर प्रेम करणार्या नागरिक, कार्यकर्ते यांची अलोट गर्दी पहाण्यास मिळाली.

 

प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर ह. भ. प. कीर्तनकेसरी अक्रुर महाराज साखरे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

यावेळी कै. बाबुरावजी आडसकर (तात्या) यांच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्याला उजाळा देण्यात आला. सत्तरच्या दशकात आडसज्ञसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत आमदारपद भूषवून लोकनेते म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. ग्रामीण भागातील विकास, शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले.

कै. आडसकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करण्यासाठी केज, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, परळी,गेवराई,परळी तसेच आडस पंचक्रोशीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार संजयजी दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ कुलकर्णी, राजकिशोर पापा मोदी, अंकुशराव इंगळे, हनुमंत काका मोरे, रमाकांत बापू मुंडे, राहुल भैय्या सोनवणे, संतोष दादा हंगे, राजेभाऊ मुंडे, नगराध्यक्षा सिताताई बनसोड, डॉ. अंजलताई घाडगे, हारूनभाई इनामदार, भाई मोहन गुंड, भगवान केदार, डॉ. वासुदेव नेहरकर, विष्णू घुले, पाशाभाई शेख, ईश्वर मुंडे, धैर्यशीलजी देशमुख, माधवराव निर्मळ, धनंजय देशमुख (मस्साजोग), डॉ. इंगोले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, आजी-माजी जि. प., पं. स. व ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, व्यापारी, शिक्षण व आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती, पत्रकार तसेच स्नेही मंडळी उपस्थित होती.

—————————–

‘तात्यांच्या पुण्याईने रमेशराव आडसकर यांचे कर्तृत्व बहरले’

यावेळी उपस्थित मान्यवर यांनी कै. बाबुरावजी आडसकर यांच्या कार्याचा गौरव करताना, “तात्यांच्या पुण्याईने रमेशराव आडसकर यांचे कर्तृत्व बहरले आहे. भविष्यात सर्वांच्या आशीर्वादाने त्यांना राजकारणात चांगले दिवस येतील,” असे सूतोवाच करून आम्ही आडसकर कुटुंबासोबत कायम उभा असल्याचे सांगितले.

—————————-

जनहिताच्या कामासाठी सदैव प्रयत्नशील राहणार : रमेशराव आडसकर

आभार प्रदर्शन करताना रमेशराव आडसकर यांनी कै. बाबुरावजी आडसकर यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित राहून अभिवादन करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. उपस्थितांचे आशीर्वाद व साथ यामुळे जनहिताचे काम करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

“स्व. तात्या आणि स्व. मेघराज आडसकर यांचे आशीर्वाद, तसेच सर्वांची साथ घेऊन सर्व जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांना सोबत ठेवत विकासकामांसाठी यापुढेही सदैव प्रयत्नशील राहणार,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आडसकर कुटुंबातील अर्चना ताई आडसकर, ऋषीभैय्या आडसकर व रंजितदादा आडसकर, शशी भैय्या आडसकर यांनी उत्तम व्यवस्थापन केले. तसेच छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी भोजन व्यवस्थेची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!