क्रांतिसिह नाना पाटील, कॉ.अण्णाभाऊ साठे जयंती, शेकापचा वर्धापन दिनी पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

क्रांतिसिह नाना पाटील, कॉ.अण्णाभाऊ साठे जयंती, शेकापचा वर्धापन दिनी पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

 

 

वारकरी सांप्रदायाचे नाव घेवून मारामाऱ्या करा म्हणणारा वारकरी नव्हेच— माजी आ. बाळाराम पाटील

 

 

स्मार्ट मिटरच्या नावाखाली सरकारकडून सामान्यांची लूट —- ॲड.मानसी म्हात्रे

 

 

केज दि ४(प्रतिनिधी)

क्रांतीसिंह नाना पाटील व कॉ अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव व भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन यानिमित्त केज येथील मुक्ताई सभागृहात भव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील पुरस्कार मूर्तींना सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

बोलताना पाटील म्हणाले

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अनेक जाती धर्मांच्या लोकांनी एकत्र येवून उभा केली . जाती धर्मात द्वेश पेटविण्याचा महाराष्ट्रात धंदा सध्या महाराष्ट्रात सध्या सुरू असून वारकरी संप्रादायाचे नाव घेवून याला मारा त्याला झोडा म्हणारा वारकरी असूच शकत नसल्याचे मत माजी मंत्री बाळाराम पाटील यांनी केज येथे आयोजित क्रांतिसिह नाना पाटील जयंती व अण्णाभाऊ साठे जयंती व शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनी पुरस्कार सोहळ्यादरम्यान केले. यावेळी स्मार्ट मिटरच्या नावाखाली हे सरकार सर्वसामान्यांची फसवणूक करत असल्याचे मत शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा नगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपद म्हणुन मा.आ. बाळाराम पाटील, ध्वजारोहण ॲड. मानसी म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले, उद्घाटकन भाई रामदास जराते यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार ज्ञानोबा गायकवाड, राजेसाहेब देशमुख, भाई पोपटराव बोराडे, ॲड नारायण गोले पाटील भाई बापूसाहेब सोळुंके, कॉ भाऊराव प्रभाळे, कॉ पंकज चव्हाण भाई बाळासाहेब धस ॲड अनिकेत देशमुख भाई राजू सुरनर , हनुमंत भोसले, शिवाजी ठोंबरे दलील इनामदार, अमोल घोगरे, बाबुराव गालफाडे सय्यद शरीफ, शितल लांडग, कपिल मस्के, बाळासाहेब मोरे, रोहित कसबे, बापु वैरागे गोपीनाथ भोसले उपस्थित होते, कार्यक्रमात बोलताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या संघर्षमय वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या देशाची लोकशाही विविध चळवळींतून शेतकरी कामगार पक्षाने पुढे नेली आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी शेकापने सातत्याने संघर्षाची भूमिका घेतली,असे त्यांनी सांगितले. क्रांतिसिंह नाना पाटील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त करताना पाटील यांनी सामाजिक समता, बंधुता आणि सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे आवाहन केले.

बीड जिल्ह्याचे नाव विविध कारणांमुळे खराब होत असताना जात-पात, धर्म किंवा कोणताही भेद न करता सर्व जाती-धर्मातील समाजघटकांना सोबत घेऊन शेकापचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, ही या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली.यावेळी भाई मोहन गुंड यांच्या पक्षबांधणीतील योगदानाचाही विशेष उल्लेख करण्यात आला. गेल्या २२ वर्षांपासून बीड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष मजबूत करण्यासाठी भाई मोहन गुंड यांनी सातत्याने काम केले असून, पक्षाचा विचार तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात पारंपारिक वाद्यांचा आनंद उपस्थितांनी घेतला. स्वामी विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक प्रबोधकांत समुद्रे व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.

पुढे बोलताना म्हणाल्या

स्मार्ट मीटरच्या नावाखाली सरकार सर्वसामान्य वीज ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असून, या निर्णयाचा सर्वाधिक फटका शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय आणि कष्टकरी जनतेला बसणार आहे, असा घणाघाती आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा अलिबागच्या नगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी केला. केज येथे आयोजित शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी सरकारच्या स्मार्ट मीटर धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज ग्राहकांच्या हिताचा विचार न करता केवळ आर्थिक भार सर्वसामान्यांच्या माथी मारण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी आपापली मते व्यक्त करताना भाई मोहन गुंड यांनी शेकाप पक्षाची पायाभरणीसाठी केलेल्या योगदानबद्दल त्यांचे कौतूक करण्यात आले.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते दहा व्यक्तींना सन्मानित करण्यात आले त्यात कॉ.राजु देसले, संपादक गंमत भंडारी, ह भ प अविनाश भारती, भाई संपत पवार, प्रा.डॉ बाबासाहेब ठोंबरे, प्रा डॉ मुकुंद राजपंखे, शाहीर तुकाराम ठोंबरे, स्वरुपा सुंदर नाईकवाडे, अनिता कांबळे, कॉ.बळवंत कदम यांना क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

शेतकरी कामगार पक्षाच्या वाढीसाठी महाराष्ट्रभर काम सुरू असून यामध्ये भाई मोहन गुंड यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. येणाऱ्या काळात शेकाप महिला आघाडीचा पाया मजबुत करण्यासाठी शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा नगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली उभारणी करण्यात येणार आहे. बीड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी शिवकन्या मोहन गुंड यांच्यावर देण्यात आली

कार्यक्रम यशस्वितेसाठी

 

पुरस्कार वितरण सोहळ्यात मत व्यक्त करताना सत्कारमूर्ती म्हणाले पुरस्काराने हात बळकट होतात असे मत सत्कारमूर्तींनी व्यक्त केले

कार्यक्रमास नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन हनुमंत घाडगे डॉ हनुमंत सौदागर यांनी केले. जनार्दन सोनवणे यांनी सन्मान पत्राचे वाचन केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाई अशोक रोडे निखिल बचुटे परमेश्वर सोळुंके स्वप्निल धनवडे दत्ता वाघमारे महेश गायकवाड मंगेश देशमुख सर्व शेकाप टिमने इतरांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!