जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यानंतर कर माफ: ॲड.प्रविण मेटे .
केज प्रतिनिधी.
केज तालुक्यातील राजेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक 6 जून 2026 रोजी ग्रामपंचायत राजेगाव चे सरपंच सौ . सुशीला मस्के यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक घेण्यात आली असून सदर मासिक बैठक मध्ये उपसरपंच ॲड.प्रविण मेटे यांनी असे सुचवले की यावर्षी जून महिन्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेगाव येथे जो कोण विद्यार्थी 1 ते 4 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नवीन प्रवेश घेईल त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयाला ग्रामपंचायत राजेगाव एक वर्ष कुठलाही कर आकारणार नाही हा ठराव घेण्यामागचा प्रामाणिक हेतू असा आहे की आपल्या गावची वैभव असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही व्यवस्थित चालावी व विद्यार्थ्याला शैक्षणिक सामाजिक सर्व गोष्टीचा ज्ञान मिळावे व जिल्हा परिषद शाळेमध्ये जास्तीत जास्त प्रवेश व्हावेत हा या मागचा हेतू आहे. तसेच या ठरावासाठी सर्व सदस्यांनी एक मुखाने होकार देण्यात आला.तरी सर्व राजेगावकरांना विनंती की आपल्या पाल्यांचे आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्यावेत ही विनंती ॲड.प्रवीण मेटे उपसरपंच राजेगाव यांनी सर्व गांवात पालकांना आव्हान केले आहे.








Leave a Reply